व्यावसायिकांना लुबाडणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला बेड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

औरंगाबाद : एकाच दिवशी जळगाव रस्त्यावरील दोन ठिकाणी दरोडे टाकून व्यापारी, शेतकऱ्याला लुटणाऱ्या संशयित टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. ही कारवाई 21 डिसेंबरला करण्यात आली. 

औरंगाबाद : एकाच दिवशी जळगाव रस्त्यावरील दोन ठिकाणी दरोडे टाकून व्यापारी, शेतकऱ्याला लुटणाऱ्या संशयित टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. ही कारवाई 21 डिसेंबरला करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, जितेंद्र मन्साराम चव्हाण (वय 25), अक्षय श्रीराम लबडे (वय 24, दोघे रा. उमरा, ता. अकोट, जि. अकोला, ह. मु. मांडणा, ता. सिल्लोड), विकास दारासिंग जाधव (वय 19), दीपक शेषराव पवार (वय 19, दोघे रा. मांडणा, ता. सिल्लोड), मंगेश ज्योतीराव बावणे (वय 26, रा. मुंडगाव, ता. अकोट, जि. अकोला) अशी संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. यातील जितेंद्र चव्हाण व अक्षय लबडेविरुद्ध यापूर्वी अकोला, अमरावती, आंध्र प्रदेशातील अदिलाबाद येथे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

विष्णू साहेबराव फाळके (वय 27, रा. देवळाणा, ता. कन्नड) हे मित्रासोबत वाहनाने शेतकी औषधी व बियाणांची ऑर्डर घेऊन सोयगावातील तिडका-वरठाण रस्त्यावरील हिवरा नदीच्या पुलाजवळून 11 डिसेंबरला सायंकाळी जात होते. त्यावेळी दोन दुचाकींवरून पाचजण आले. त्यांनी फाळके यांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावून त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर लुटारूंनी दोघांच्या खिशातील चार हजार रुपये व दोन मोबाईल हिसकावून पोबारा केला.

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

रात्री सव्वाआठच्या सुमारास या टोळीने सोयगाव ते फर्दापूर रस्त्यावरील जंगला तांड्याजवळून जाणाऱ्या मनोज इंदलसिंग ठाकूर (वय 35, रा. वरखेडी खुर्द, ता. सोयगाव) यांचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी ठाकूर यांना अडवून मारहाण केली. बाकीच्या लुटारूंनी साडेचार हजारांची रक्कम व दोन मोबाईल व 18 हजारांचे धनादेश हिसकावून पळ काढला.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

दोन्ही प्रकरणांत सोयगाव व फर्दापूर पोलिस ठाण्यांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मांडणा गावातून संशयित टोळीला ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सहायक फौजदार सुधाकर दौड, सय्यद झिया, जमादार नामदेव सिरसाठ, राजेंद्र जोशी, शिपाई योगेश तरमाळे, ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे यांनी मांडणा गावातून टोळीला ताब्यात घेतले. या टोळीकडून रोख, दुचाकी व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

एकाच टोळीकडून लूट

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी एकाच टोळीने दरोडे टाकल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता टोळी सिल्लोड तालुक्‍यातील मांडणा गावात असल्याचे स्पष्ट झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dacoits Arrested in Aurangabad