नागराळेच्या दादासोने पहिल्या पगारातून शाळेला दिली टाकी

tank
tank

औरंगाबाद : "आम्हाला काय, तू आयुष्यभर आहेसच, त्यापेक्षा शाळेवर खर्च कर.'' पहिल्या कमाईचा आनंद शेअर करतेवेळी अशी प्रतिक्रिया होती दादासो पाटीलच्या आईची. त्यास जोड मिळाली वडिलांच्या सामाजिक कार्याची. नागराळेतील (ता. पलुस, जि. सांगली) हा तरुण डिसेंबरमध्ये औरंगाबादेत एका मॉलमध्ये नोकरीला लागला आणि पहिला पगार शाळेला दिला. मित्राच्या वाढदिवशी गुरुवारी (ता. 28) शाळेत पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे.

दादासो याने पहिलवान विष्णू नागराळे विद्यामंदिरमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. केबीपीला बारावीपर्यंत तर आरआयटीला एमबीए पूर्ण केले. यादरम्यान, गड्याला वयाच्या आठव्या वर्षांपासून कुस्तीचा नाद. यातून तीन-चार तालुक्‍यांत मित्रपरिवार तयार झाला. मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दादासो याला तुफान शिंदे, रोहित शिंदे, आशुतोष पाटील जोडले गेले. प्रतिष्ठानमध्ये कुणाचा वाढदिवस असला की डीजे, पार्टीवर खर्च न करता तो पैसा शिवकार्य आणि समाजकार्यासाठी वापरला जाण्याची परंपरा सुरू झाली. यातून वृद्धाश्रमात मदतीसोबत रक्‍तदान शिबिरेही घेतली. 

दादासोने जेव्हा पहिला पगार शाळेला द्यायचा निर्णय घेतला तेव्हा पाण्याची टाकी देण्याचे ठरले. माकडांच्या उच्छादात टाकी फुटली होती. दहा हजार रुपयांची मदत दिली आहे. शाळेतील 150 विद्यार्थ्यांचा पाणीप्रश्‍न मिटला आहे. उसाच्या लागणीला जाऊन सव्वा लाख कमवून शिक्षण पूर्ण करणारे रोहितही याच प्रतिष्ठानमध्ये आहेत. नावीन्यपूर्ण मोहिमा हेच मावळाचे वैशिष्ट्य असल्याने गावातही यांच्या उपक्रमाची चर्चा होते. दादासो याचे वडील सोनहिरा कारखान्यात असून दोन बहिणींची लग्ने झाली आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील दादासो शाळेतील दहावीच्या वर्ष 2012च्या बॅचचा विद्यार्थी आहे. या उपक्रमाने त्याचे कौतुक होत आहे.

शाळेतील पाण्याची टाकी सहा महिन्यांपासून फुटली होती. मित्राचा काल वाढदिवस होता, त्यानिमित्त टाकी दिली. सोबत शालेय साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटल्याचा आनंद आहे. 
- दादासो पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com