
22, 23 व 24 नोव्हेंबरला नागसेनवनात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत देश विदेशातील उपासक सहभागी होणार असून धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मादेसना या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार आहे.
औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त समता वाहन रॅली रविवारी (ता 17) सकाळी शहरात काढण्यात आली. 22, 23 व 24 नोव्हेंबरला नागसेनवनात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत देश विदेशातील उपासक सहभागी होणार असून धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मादेसना या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार आहे.
सकाळी आठ वाजेपासून धम्म उपासक-उपसिका कुटुंबासोबत भडकलगेट परिसरात जमायला सुरुवात झाली होती. दहाच्या सुमारास विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल यांनी रॅलीला झेंडा दाखवून रॅली मार्गस्थ झाली. संयोजक उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ अरविंद गायकवाड शिस्तीच्या सूचना व मार्गदर्शन करत होते.
चळवळीतील कार्यकर्ते सहभागी
युवक युवती पांढऱ्या वस्त्रामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दहाच्या सुमारास भडकल गेट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल यांनी रॅलीला झेंडा दाखवून वाहन रॅली मार्गस्थ झाली. रॅलीत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महिलांचा सहभाग लक्षणीय
भडकलगेट ते अण्णाभाऊ साठे चौक मार्गे टीव्ही सेंटर-जळगाव रोड मार्गे सिडको बसस्टँड-एयर पोर्ट-वसंतराव नाईक चौक(सिडको बसस्टँड) ते जयभवानी नगर ते गजानन महाराज चौक ते चेतक घोडा चौक (बौद्ध नगर) ते रमानगर-नागसेननगर ते उस्मानपुरा-एसएससी बोर्ड ते कोकनवाडी चौक-क्रांती नगर-महावीर चौक(बाबा पेट्रोल पंप) ते मिलकॉर्नर मार्गे नागसेनवन येथे दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप झाला. रॅलीत उपासक-उपसीका यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून शक्य त्यांनी हेल्मेट परिधान केले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
देश विदेशातील उपासक सहभागी होणार
22, 23 व 24 नोव्हेंबरला नागसेनवनात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत देश विदेशातील उपासक सहभागी होणार असून धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मादेसना या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार आहे. सध्या देशभरातून भन्तेजी शहरात दाखल होत असून त्यांची व्यवस्था शहरातील बौद्ध विहारात करण्यात येत आहे. नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून राज्यभरातून स्वयंसेवक ही शहरात येत असून त्यांची व्यवस्थाही उपसकांच्या घरी करण्यात आली आहे.
हेही वाचा -
अट्टल दारूडेच करतायत दारुड्यांना व्यसनमुक्त
ते नालीच्या घाणीतही शोधतात सोन्याचे कण
आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या हर्षदा पवारला सुवर्ण