दलालवाडीचे ‘नारेगाव’ होण्याचा धोका

औरंगाबाद - औषधी भवनखालील नाल्यातील गाळ काढला खरा, पण तिथेच लावून देण्यात आला आहे. यामुळे हा गाळ पाण्याने वाहून पुन्हा नाल्यातच जाणार आहे.
औरंगाबाद - औषधी भवनखालील नाल्यातील गाळ काढला खरा, पण तिथेच लावून देण्यात आला आहे. यामुळे हा गाळ पाण्याने वाहून पुन्हा नाल्यातच जाणार आहे.

औरंगाबाद - दरवर्षी पावसाळा आला, की औषधी भवनखालील नाल्याचा प्रवाह खंडित झाल्यानंतर ओव्हरफ्लो होणारे पाणी बाजूच्या दलालवाडी, चुनाभट्टी परिसरातील घरांमध्ये शिरते. रहिवाशांचे संसार पाण्यावर तरंगत वाहत जातात. नेते, प्रशासनाचे अधिकारी येतात आणि फोटोसेशन करून निघून जातात.

रहिवाशांचा प्रश्‍न तसाच राहतो. वर्षानुवर्षे दलालवाडीकरांचा हाच प्रश्‍न आहे. यावर्षीही नाला दाखवण्यापुरता साफ केला आणि गाळ नाल्यातच सोडून दिला आहे. थोडा पाऊस आला तरी दलालवाडीत हाहाकार उडण्याची शक्‍यता आहे. यामुळे महापालिका प्रशासन दलालवाडीत नारेगावसारखी स्थिती होण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्‍न नागरिकांनी केला. 

औषधी भवनखालून वाहणाऱ्या नाल्यातील गाळ, कचरा काढण्याची जबाबदारी त्यांचीच राहील, अशी लीजवर देताना अट टाकण्यात आली आहे. मात्र, वर्षानुवर्षे औषधी भवनवाले नाल्याची सफाई करत नसल्याने नाल्याचे पात्र आणि स्लॅबमध्ये दोन ते तीन फूटच अंतर राहिले आहे. यावर्षी ओरड होऊ नये यासाठी नाल्यातील गाळ काढला मात्र तिथेच सोडून देण्यात आला आहे. पाऊस पडल्यानंतर नाला ओव्हरफ्लो होऊन दलालवाडीत पाणी घुसण्याचा धोका वाढला आहे.

रहिवासी म्हणतात...
नैसर्गिक प्रवाहाला अडथळा

चंद्रशेखर मिरजकर - नाल्यामध्ये इमारती उभ्या केल्याने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. औषधी भवनखाली कचरा, गाळ साचल्याने नाल्याचे पात्र स्लॅबला टेकले आहे. जोराचा पाऊस पडला की नाल्याचा प्रवाह खंडित होणार आणि बॅकवॉटर शेजारच्या नागरी वस्तीत घुसणार. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाच्या उच्चतम बिंदूस बाधा पोचविणे हे गैरकृत्य आहे. 

गाळ पुन्हा नाल्यातच
अशोक शिंदे : दोन-तीन दिवसांपूर्वीच्या पावसाने दलालवाडीत पाणी घुसले. ते ओसरण्यासाठी पाच तास वाट बघावी लागली. जोपर्यंत औषधी भवनखालून पाणी जात नाही तोवर दलालवाडीतील पाणी ओसरत नाही. पूर्वी भवन आणि नाल्यामध्ये दहा ते बारा फुटाचे अंतर होते; मात्र सफाईअभावी आता हे अंतर तीन फूटसुद्धा राहिले नाही. यावर्षी नाला साफ केला परंतु गाळ तिथेच टाकून दिला आहे. तो पुन्हा पावसाने वाहून नाल्यातच जाईल. 

लीज रद्द करण्याची मागणी
स्वरूप जाधव : आतापर्यंत ओमप्रकाश बकोरिया यांचा अपवाद वगळता यापूर्वीच्या अन्य कोणत्याही आयुक्‍तांनी या नाल्याचा प्रश्‍न गांभीर्याने घेतला नाही. मात्र राजकारण्यांनी आडकाठी आणली. औषधी भवनपासून पाठीमागे आणि पुढे शंभर ते दीडशे फूट नालासफाई केल्याशिवाय प्रश्‍न सुटणार नाही. तीन मोठ्या इमारती या नाल्यावर आहेत. नवीन आयुक्‍तांना भेटून त्यांची लीज रद्द करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com