दलित ऐक्‍यासाठी जोगेंद्र कवाडे यांना साकडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

औरंगाबाद - दलित ऐक्‍य ही काळाची गरज असल्याने यासाठी सर्व पक्ष संघटना व नेत्यांना सामावून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे साकडे दलित ऐक्‍य कृती समितीने प्रा. जोगेंद्र कवाडे यांना घातले. त्याला प्रतिसाद देत कवाडे यांनी विनाशर्त पाठिंबा देऊन यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. 

दलित ऐक्‍य कृती समितीतर्फे प्रा. जोगेंद्र कवाडे यांची सुभेदारी विश्रामगृहावर भेट घेऊन त्यांना ऐक्‍यासाठी पुढाकार घेण्यासाठी विनंती करण्यात आली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत सर्व दलित संघटनांची वाताहत झाली. त्यामुळे सर्व पक्ष संघटनांनी तसेच नेत्यांनी एकत्र येऊन आगामी वाटचाल करण्याची गरज आहे, यावर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे बंडू कांबळे, कृष्णा बनकर, प्रकाश गायकवाड, मिलिंद खंडागळे, आशिष दाभाडे, लखन मघाडे, अशोक निकम, आशिष गायकवाड, जनार्धन येडे, अण्णा दाभाडे, ज्ञानेश्‍वर खरात, अण्णा भालेराव, साहेबराव पगारे, आशिष कोल्हे, शाम खिल्लारे, राजू डोंगरे, अशोक सोनवणे, सुभाष आमराव, सचिन प्रधान, कुकेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Dalit ekya jogendra kawade