धरण भरेल; पण पाणी खैरेंच्या आशीर्वादानेच! - हरिभाऊ बागडे

Haribhau-Bagade
Haribhau-Bagade

औरंगाबाद - ‘प्रार्थना करतो, की पाऊस पडेल, जायकवाडीही भरेल; पण खैरे साहेबांनी आशीर्वाद दिला तर पाइपलाइन होईल आणि शहराला पाणी मिळेल,’ असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काढला.

जिल्हा गणेश महासंघातर्फे संस्थान गणपती येथील मिरवणूक प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शहराच्या पाणीप्रश्नाला गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचा फुटली. मिरवणुकीपूर्वी आयोजित कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी आपल्या भाषणात पावसाबाबत बोलता बोलता आपला मोर्चा शहराच्या पाणीप्रश्नाकडे वळवला. पाऊस पडावा, जायकवाडी धरणही भरावे असे सांगतानाच श्री. बागडे म्हणाले, की ‘खैरे साहेबांनी आशीर्वाद दिला तर पाइपलाइन (समांतर) होईल आणि शहराला पाणीही मिळेल!’ यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

तब्बल १४ तास मिरवणूक
सकाळी अकरापासून निघालेल्या मिरवणुका रात्री एकपर्यंत म्हणजेच १४ तास चालल्या. यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या ठिकाणी लाडक्‍या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळांसोबतच घराघरातील मूर्तींची स्थापना करणाऱ्या मंडळींनी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com