वाण धरणातील एक दलघमी पाणी सोडले नदीपात्रात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

बीड - ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या नागापूर (ता. परळी) परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलासा दिला आहे. सोमवारी (ता.17) त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर वाण धरणातील एक दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. 

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्याअभावी होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी वाण धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. त्यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना नदीपात्रात पाणी सोडण्याचे निर्देश सोमवारी दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू केली. वाण धरणात सध्या 41 टक्के म्हणजेच 8.40 दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून त्यातील 1 दलघमी पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. नागापूर, पांगरी, लिंबोटा, सफदराबाद आदी गावांतील ग्रामस्थांना, तसेच पशुधन मालकांना या पाण्याचा फायदा होणार आहे.

Web Title: Dam water left in river