ग्रामीण भागात दानिमी पथक सक्रीय  

ग्रामीण भागात दानिमी पथक सक्रीय  

फुलंब्री : जिल्हाभरात दामिनी पथक अत्यंत पारदर्शकपणे जबाबदारी निभावत आहे. तसेच लोहगावात सर्वसामान्यान रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट डॉक्टरवर कारवाई केल्याने दामिनी पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मनीषा लटपटे व त्यांच्या सहकाऱ्यांचा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सोमवारी (ता.8) प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केला. 

सध्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील महाविद्यालयात रोड रोमिओंचा विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु, दोन वर्षपासून दामिनी पथक प्रमुख मनीषा लटपटे यांनी ग्रामीण भागात दामिनी पथक सक्रीय केल्यामुळे रोडरोमिओंना वेळीच चोप बसला. त्यामुळे आज ग्रामीण भागातील मुलींना महाविद्यालय परिसर, बस स्थानक आदी ठिकाणी रोडरोमिओंचा होणारा त्रास बंद झाल्याने ग्रामीण भागातही दामिनी पथकाला मोठ्या प्रमाणत यश आले आहे. दामिनी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालयात जनजागृती करून मुलींना स्वावलंबी बनविण्याचे धडे देण्यात आले. तसेच याच दामिनी पथकाने लोहगाव येथील रुग्णावर अॅलोओपॅथीच्या ट्रीटमेंट करणाऱ्या बनावट डॉक्टरवर रोग्य कार्यवाही करून गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली होती.

सदरच्या कार्यवाहीत दामिनी पथकाच्या मनीषा लटपटे, पोलीस नाईक व्ही.आर.पवार, मुसळे, साळवे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार पोलिस ठाणे अंतर्गत बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये उत्कृष्ट तपास करून आरोपींना विरुध्द दोषसिद्धी होऊन त्यांना दहा वर्ष कारावास व दहा हजार दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. या उत्कृष्ट तपासाबद्दलही मनीषा लटपटे यांचा सत्कार करून प्रशस्तीपत्र देण्यात आले. या सत्कार समारंभामुळे इतर अधिकारी व कर्मचारी यांना उत्कृष्ठ काम करण्याकरिता निश्चितच प्रोत्साहन व स्फूर्ती मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com