ओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

सिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन शनिवार (ता.19) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला

सिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन शनिवार (ता.19) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार अजिंठ्याहुन सिल्लोडकडे जात असलेला ट्रक (क्रमांक यूपी.93.बीटी.5959) व विजापुर (कर्नाटक) येथून दिल्ली येथे लिंबू घेऊन जात असलेला ट्रक (क्रमांक आरजे.32.जीसी.1253) यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन्ही ट्रक रस्त्यावर पलटी झाले. यामध्ये जितेंद्रलाल ठाकूर (वय.28, रा.झांसी) याच्या डोक्याला गंभीर मार लागला असुन, सुंदर रेखवाल (वय.28, रा.झांसी) हा देखील गंभीर जखमी झाला. तर एक जन जागीच ठार झाला असुन त्याचे नाव अद्याप कळाले नाही. अपघातानंतर अजिंठा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन, अपघतातील जखमीना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: The danger accidents of two tacks while overeating; one dead