
इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे जालना शहर अंधारात
जालना : शहराचे तापमान भर पडत असताना कोळसा पुरवठा अभावी गुरुवारी (ता.सात) शहरातील दुपारी इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे वीज गुल झालेली वीज रात्री उशिरापर्यंत आली नाही. त्यामुळे जालनेकर हैराण झाले होते.
जालना शहराचे तापमान हे 41.7 सेल्सिअस अंशपर्यंत जाऊन पोहले आहे. अशात उकाड्याने जालनेकर हैराण झाले होते. त्यात गुरुवारी (ता.सात) शहरासह जिल्ह्यात दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक इमर्जन्सी लोडशेडिंग लागू केली.परिणामी शहरासह जिल्ह्यातील वीज दुपारपासून गुल झाली. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत वीज आली नाही. शिवाय ही इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे गेले वीज कधी येईल यांची कल्पना महावितरणच्या अधिकऱ्यांना ही नव्हती. हा वीज पुरवठा कोळसा टंचाईमुळे झाल्याचे अधिकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात इमर्जन्सी लोडशेडिंग लागू केल्याने शहरासह जिल्ह्यातील वीज दुपारपासून गेली आहे. त्यामुळे वीज किती वाजेपर्यंत सुरळीत होईल हे सांगणे कठीण आहे.
- अर्शद पठाण, मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, जालना.
Web Title: Darkness Jalna City Power Outage Emergency Load Shedding
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..