तलाठी असलेल्या बापाने पुसले लेकीचे कुंकू : असे काय होते कारण ?
याबाबत नर्सी नामदेव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव जयचंद वाठोरे (वय २१) राहणार शिंदेफळ ता. जि. हिंगोली, हल्ली मुक्काम कमलानगर, हिंगोली हा याच भागात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम करुन तिच्यासोबत प्रेमविवाह केला होता.
हिंगोली : आपल्या मुलीशी केलेल्या प्रेम विवाहाचा राग मनात धरून शहरातील कमलानगर येथील २१ वर्षीय तरुणाचा सासऱ्याने त्याच्या तीन ते चार साथीदारांसह खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत नर्सी नामदेव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव जयचंद वाठोरे (वय २१) राहणार शिंदेफळ ता. जि. हिंगोली, हल्ली मुक्काम कमलानगर, हिंगोली हा याच भागात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम करुन तिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. वैभव याचे जिजामातानगर येथील मधूकर लोणकर यांच्या मुलीशी जून २०१९ प्रेमविवाह झाला होता. तर त्यापुर्वी याच प्रेम प्रकरणातून वैभववर अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा गुन्हाही दाखल झाला होता.
हेही वाचा - भ्रष्टाचार प्रतिबंधक पथक आपल्या दारी; लाचखोरीवर नियंत्रणासाठी एसीबीचा उपक्रम -
सासऱ्याने मला रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी बोलावले होते
वैभव वाठोरे याने त्याचा मित्र महेंद्र पडघन याला ता. ३० नोव्हेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास फोन केला होता. या फोनमध्ये बोलताना त्याने महेंद्र पडघन यांना सांगितले की, माझ्या सासऱ्याने मला रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी बोलावले आहे. तिकडे काही माझे बरेवाईट झाल्यास तू लक्ष ठेव. या ऑडिओ क्लिपनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हा त्याचा सासरा असल्याचे निश्चित झाले. वैभव याने त्याच्या सासऱ्यावर संशय व्यक्त केल्यामुळे या खुनाला वाचा फुटली आहे.
विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला
लग्नानंतर सासरा आणि जावयामध्ये न पटल्याने दोघामध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली. याच प्रेम प्रकरणातून मयत वैभव याला जिवे मारण्याच्या धमक्या सासऱ्याकडून मिळत होत्या. ता. ३० ऑक्टोबर रात्री वैभव सासऱ्यासोबत जातो म्हणून बाहेर गेला तो परत आलाच नाही. त्याची चौकशी केली असता तो कुठेही मिळून आला नाही. तर दोन नोव्हेंबर रोजी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चांगेफळ शिवारात हरिश्चंद्र शिंदे यांच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. तसेच मयताच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली आहे. यात कामधंदा नसल्याने आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या केली असल्याचे नमूद आहे. ही चिठ्ठी एका पॉलीथीन बॅगमध्ये आहे. यामुळे संशय बळावत होता.
येथे क्लिक करा - गोकुंद्यातील महिला मंडळाच्या कोजागिरीला आले आनंदाचे उधान
नर्सी नामदेव पोलिसानी खूनाचा गुन्हा दाखल
मयताला जीवे मारण्यापूर्वी विचार करून त्याचा काटा काढण्याच्या हेतूने काम केले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मिडीयावर मयताचे वर्णन देवून आवाहन केले असता, मयताचे मित्र राहुल खिल्लारे आणि अक्षय इंगोले यानी ही माहिती मयताच्या वडीलांना कळविली. त्यानंतर रात्रीच मयताची ओळख पटली. मयताचे वडील जयचंद वाठोरे यानी दिलेल्या फिर्यादीनुसार मयताचा आरोपी सासरा मधूकर लोणकर ( तलाठी ) याने त्याची मुलगी निकिता हिच्याशी मयताने केलेल्या प्रेमविवाहाच्या कारणावरून ३ ते ४ साथिदारांसह वैभव वाठोरे याचे हातपाय बांधून विहिरीत फेकून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. त्यावरून नर्सी नामदेव पोलिसानी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे