Video And Photos : लेकीचे लग्न भारतीय संविधानाला समर्पित - कसे ते वाचायलाच पाहिजे

शिवचरण वावळे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

सगे सोयरे व आप्तस्वकीयांना आहेर न करता अनाथ मुलींना या विवाह सोहळ्यात आहेर देऊन डाॅ. अनंतराव राऊत यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. हा अनोखा विवाह सोहळा गुरुवारी (ता.१३ फेब्रुवारी २०२०) नांदेड शहरात झाला.

नांदेड : ‘लग्नसमारंभ म्हटले की मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी’ असे समीकरण आपल्याला बघायला मिळते. परंतु, पेशाने प्राध्यापक असलेले डॉ. आनंत राऊत या वधूपित्याने मात्र याला अपवाद ठरतील. त्यांनी सर्व पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन भारतीय संविधानाची मूल्य सर्वांपर्यंत पोहोचविले. लग्नसोहळ्यात भारतीय राज्यघटनेने मानवाला दिलेले अधिकार हक्क याबाबतची जाणीव जागृती लग्न समारंभातून त्यांनी करून दिली. 

शहरातील पावडे मंगल कार्यालयात गुरुवारी प्रा. डॉ. अनंत राऊत यांच्या मुलीचा सत्यशोधकी पद्धतीने विवाह पार पडला. पारंपारिक विवाह सोहळ्याला फारकत देत प्रा. राऊत यांनी लग्न समारंभातून सामाजिक व समतेची जाणीव करून देणारी गीतेही सादर केलीतल. विवाह सोहळ्यात कुठेही बडेजाव न करता भारतीय संविधानाच्या संस्कृतीचे चित्रप्रदर्शन मंगल कार्यालयात भरविण्यात आले होते. यामध्ये मतदानाचा अधिकार, लोकशाहीचे मूल्य, भारतीय संविधानाचे प्रास्ताविक, नागरिकांचे हक्क, कर्तव्य याबाबतचे विविध चित्र प्रदर्शनातून जाणीव जागृती करून देण्यात आली.

लग्नपत्रिकेतूनही प्रबोधन

No photo description available.
मंगल कार्यालयामध्ये भारतीय संविधानाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

लग्नपत्रिकेवर देखील भारतातील मानवतावादी, समतावादी महापुरुषांच्या आदर्श विचारांचे दर्शन घडविण्यात आले. मानवाच्या कल्याणासाठी ज्या महापुरुषाने कार्य केले; अशा महामानवास हे लग्न जणू समर्पित होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, विज्ञानवाद, बुद्धिवाद भारतीय जनतेमध्ये उज्वला पाहिजेत असा विचार त्यांनी या लग्न समारंभातून दिला. आपले आदर्श कुठल्याही जात समुहा वरून न ठेवता, सर्व समावेशक विचारधारा मानवनिष्ठ कर्तृत्व आवळून ठरवाव्यात हाच मूलभूत संदेश या विवाह सोहळ्यातून प्रा. राऊत परिवाराने दिला. 

संविधानाला समर्पित केले वधूपित्याने लेकीचे लग्न

Image may contain: 7 people, people standing
नवदांपत्यांच्या हस्ते अनाथ मुलींना आहेर देण्यात आला.

पीपस महाविद्यालयातील मराठी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनंत राऊत हे मागील अनेक वर्षापासून भारतीय संविधानाबाबत कार्यक्रम घेऊन जनजागृतीचे काम करत आहेत. दरवर्षी ते संविधान महोत्सव आयोजित करतात. हीच खुणगाठ बांधून त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नातही भारतीय संविधानाची मूल्य नागरिकांमध्ये रुजली पाहिजेत यासाठी हा अनोखा आणि समाजपरिवर्तनासाठी दिशादर्शक ठरणारा निर्णय घेतला.  

आगळावेगळा सत्यशोधकी विवाह सोहळा
पारंपारिक विवाह सोहळ्यास फारकत देत सामाजिकतेची जाणीव करून देणारी रंगली होती संगीत मैफिल. तसेच विवाह सोहळ्यात संविधानाच्या संस्कृतीचे भरविले होते चित्रप्रदर्शन. अनाथ मुलींना लग्नसमारंभात केला सन्मान. शिवाय विवाह पत्रिकेत मानवतावादी समतावादी महापुरुषांच्या आदर्श तत्वांचाही संदेश दिला.

समाजपरिवर्तनासाठी निर्णय

Image may contain: 1 person, selfie and closeup
प्रा. डाॅ. अनंत राऊत, नांदेड

सामाजिकतेची खुणगाठ बांधून आपल्या मुलीच्या लग्नातही भारतीय संविधानाची मूल्य नागरिकांमध्ये रुजली पाहिजेत यासाठी मी हा अनोखा आणि समाजपरिवर्तनासाठी दिशादर्शक ठरणारा निर्णय घेतला.      - प्रा. डाॅ. अनंत राऊत  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daughter's Marriage Dedicated To The Indian Constitution Nanded News