जायकवाडी धरणाच्या पात्रात आढळले पती-पत्नीचे मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पैठण, (जि. औरंगाबाद)  : जायकवाडी धरणाच्या पात्रात सोमवारी (ता. चार) सकाळी पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. या मृत दांपत्याची ओळख पटली असून ते तीसगाव (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील रहिवासी आहेत. कीर्ती सचिन लवंडे (वय 22), सचिन विठ्ठल लवंडे (वय 28) अशी त्यांची नावे आहेत. या दांपत्याने आत्महत्या का केली, याबाबतचे गूढ निर्माण झाले आहे.

जायकवाडी धरणाच्या पात्रात सोमवारी (ता. चार) सकाळी दहाच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे धरणावर मॉर्निग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना दिसले. त्यांनी ही माहिती पोलिस ठाण्यास कळविली. पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचिन सानप, रामकृष्ण सांगडे, सहायक फौजदार नामदेव कातडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन, तरुणीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. हा मृतदेह पैठणच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. यानंतर तरुणीचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणीच दुपारी तीनच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पुन्हा पोलिसांनी धरणावर जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात आणला. या घटनेची माहिती सोशल मीडियावरून देण्यात आली. विवाहित तरुणीच्या नातेवाइकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरून ओळख पटली. मृत तरुणीचे माहेर मच्छिंद्रनाथ चिंचोली (ता. घनसावंगी, जि. जालना) असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आत्महत्या की घातपात? 
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हे दांपत्य पैठणला कधी व कोठून आले याबाबतची चौकशी पोलिस करीत आहेत. घटनास्थळी या दांपत्याची दुचाकीही पोलिसांना आढळून आली आहे.  ही आत्महत्या आहे की घातपात यादृष्टीने पोलिसांना तपास करून घटनेचे गूढ उकलावे लागणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead bodies of couple found in jayakwadi dam