जालन्यात तलावात आढळला तरुणाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुक्तेश्वर तलावाच्या बाजुला असलेल्या एक डबक्यात मंगळवारी (ता.28) सकाळी सात वाजन्याच्या दरम्यान एक शाळकरी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. आदित्य पार्श्वनाथ सदावर्ते (वय 16, रा. मंमादेवीनगर, जालना) असे मयताचे नाव आहे.

जालना : मुक्तेश्वर तलावाच्या बाजुला असलेल्या एक डबक्यात मंगळवारी (ता.28) सकाळी सात वाजन्याच्या दरम्यान एक शाळकरी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. आदित्य पार्श्वनाथ सदावर्ते (वय 16, रा. मंमादेवीनगर, जालना) असे मयताचे नाव आहे.

आदित्य सदावर्ते हा सोमवारी (ता.27) दुपारी साडेतीन वाजन्याच्या सुमारास खासजी शिकवनीसाठी घराच्या बाहेर पडला होता. मात्र ते रात्री उशीरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोधा शोध केली. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर मंगळवारी (ता.28) सकाळी सात वाजन्याच्या सुमारास मुक्तेश्वर तलावाच्या बाजूला असलेल्या एक डबक्यात तरुणाचा मृतदेह सापडला. तो मृतदेह आदित्य सदावर्ते याचा होता.

या घटनेची माहिती मिळातच नातेवाईकांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात अशी चर्चा सुरु होती.

Web Title: dead body found in dam in Jalna