लातूर : चाकुरमध्ये पुरलेले प्रेत नेले उकरून

प्रशांत शेटे
मंगळवार, 27 मार्च 2018

पोलिस उपनिरीक्षक संतोष गित्ते, एस. डी. बनसोडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. नेमके कशासाठी व कोण प्रेत उकरून नेले याचा तपास केला जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक श्री. तट यांनी दिली.

चाकूर, (जि. लातूर) : येथील शेटे व स्वामी यांच्या स्मशानभूमित पाच ते सहा वर्षापुर्वी पुरलेले प्रेत उकरून नेण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता.२७) उघडकीस आली आहे. 

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ही स्मशानभूमी असून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पुरलेले प्रेत उकरून नेले असल्याची माहिती चंद्रकांत स्वामी यांना मिळाली. यावरून नगरसेवक शिवप्रसाद शेटे, अॅड. युवराज पाटील, सूरज शेटे, संदीप शेटे, संगमेश्वर शेटे, महालिंग स्वामी, राजू शेटे, नरेंद्र शेटे यांनी माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांना दिली.

पोलिस उपनिरीक्षक संतोष गित्ते, एस. डी. बनसोडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. नेमके कशासाठी व कोण प्रेत उकरून नेले याचा तपास केला जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक श्री. तट यांनी दिली.

Web Title: dead body mystery in latur