शौचालय बांधकामावरून प्राणघातक हल्ला

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 8 मे 2018

एका महिलेसह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना किनवट तालुक्यातील कोल्हारी येथे सोमवारी (ता. 7) घडली.

नांदेड - घराशेजारी शौचालय का बांधता म्हणून चक्क दोघांवर बारा जणांनी प्राणघातक हल्ला चढविला. यात एका महिलेसह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना किनवट तालुक्यातील कोल्हारी येथे सोमवारी (ता. 7) घडली. 

किनवट तालुक्यात राहणाऱ्या मंगलबाई गणपतराव डंके (वय 65) या आपल्या घरी शौचालयाचे काम करीत होत्या. याचा त्रास आम्हाला होईल म्हणून हा शौचालय बांधु नका, असे म्हणून आनंदा जमादार यांनी वाद घातला. एवढेच नाही तर त्याने संदीप जमादार, कपील जमादार, बालाजी जमादार, दिलीप जमादार, विष्णु जमादार, सरस्वती जमादार, शिवकांता जमादार, साधना जामादार, अल्का जमादार, विक्रम एगलेवाड आणि संजय एगलेवाड यांना बोलावून घेऊन मंगलाबाई डंके यांना त्यांच्या घरच्या एका नातेवाईकाला गंभीर मारहाण केली. यात लोखंडी रॉडने दोघांचेही डोके फोडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तपास एपीआय रामेश्‍वर कायंदे हे करीत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A deadly attack in Nanded because of toilets construction issue