रत्नेश्‍वरीच्या कुंडात पडून भक्ताचा मृत्यू; मयत चौफाळा येथील रहिवासी 

The death of the devotee falls in the Ratneshwari kund
The death of the devotee falls in the Ratneshwari kund

नांदेड : नवरात्रीनिमित्त शहरापासून जवळच असलेल्या रत्नेश्‍वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका भक्ताचा कुंडात पडून मृत्यू झाला. रमेश नारायण गरुडकर (वय 20) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. 14) सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

नांदेड पासून 15 किलोमिटर अंतरावर असलेल्या लोहा तालुक्यातील वडेपुरीच्या डोंगरावर प्रसिध्द असलेल्या रत्नेश्‍वरी देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी नांदेडच्या चौफाळा भागातील रमेश नारायण गरुडकर हा मित्रांसोबत गेला होता. दर्शन घेण्यापूर्वी तो मित्रांसमवेत मंदीर परिसरात असलेल्या प्राचीन कुंडात पोहण्यासाठी उतरला. परंतु त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो कुंडाच्या तळाशी जावून गाळात फसला. यातच त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी बाहेर येऊन उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना व गोदा जीवरक्षक दलाच्या जवानाना सांगितले. सकाळी नऊ वाजता तो बुडाला होता. जीवरक्षकांच्या जवानानी अथक प्रयत्न करून तब्बल दोन तासांनी त्याला बाहेर काढले. मयत रमेश हा एकूलता एक मुलगा होता. तसेच तो एका दुकानावर कामाला होता. परंतु त्याचा देवीच्या पायथ्याशी असलेल्या कुंडात बुडून मृत्यू झाल्याने देवस्थान व चौफाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस हवालदार एम. आर. इंगळे आणि श्रीकांत कांबळे यांनी पंचनामा करून मृतदेह शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी सोनखेड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com