गंगापूरजवळ अपघातात डॉक्टरचा मृत्यू, मनसेचे शहराध्यक्ष जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

डॉ. अमोल वावरे यांच्या पत्नी मैत्रिणींसोबत औरंगाबादला चित्रपट बघण्यासाठी गेल्या होत्या. चित्रपट बघितल्यानंतर डॉ. अमोल व मुकुंद पाठे यांचे औरंगाबाद शहरात काम असल्याने त्यांनी पत्नीला मैत्रिणींसोबत बसमध्ये बसवून घरी जाण्यास सांगितले.

गंगापूर : औरंगाबाद-पुणे महार्गावरील जिकठाण फाट्यावर (ता.गंगापूर) रविवारी (ता. 14) मध्यरात्री कार आणि ट्रक यांच्या  अपघातात गंगापूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अमोल आप्पासाहेब वावरे (वय 32) हे जागीच ठार झाले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मुकुंद भास्कर पाठे (वय 32) जखमी झाले आहेत.

डॉ. अमोल वावरे यांच्या पत्नी मैत्रिणींसोबत औरंगाबादला चित्रपट बघण्यासाठी गेल्या होत्या. चित्रपट बघितल्यानंतर डॉ. अमोल व मुकुंद पाठे यांचे औरंगाबाद शहरात काम असल्याने त्यांनी पत्नीला मैत्रिणींसोबत बसमध्ये बसवून घरी जाण्यास सांगितले. 

काम आटोपल्यानंतर डॉ. वावरे आणि पाठे हे गंगापूरच्या दिशेने निघाले होते. मात्र, जिकठाण फाट्यावर नवीन उभारलेल्या गतिरोधकापाशी त्यांच्या गाडीपुढे चालणारा ट्रक अचानक थांबला. त्या ट्रकला पाठीमागून येणारी डॉ. वावरे यांची कार धडकली. या ट्रकमधील सळई डॉ. वावरे यांच्या अंगात घुसल्याने ते जागीच ठार झाले, तर गाडीत बसलेले पाठे जखमी झाले आहेत. पाठेंवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत..

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of doctor in Gangapur accident injured MNS city president