येलदरी धरणात बूडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

जिंतूर ( जिल्हा परभणी)  :  येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी चंद्रकांत बनाटे यांचा मुलगा  नितीन बनाटे (वय २६) मित्रांसोबत येलदरी धरणात (ता.जिंतूर, जि.परभणी) पोहण्याकरिता गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१४) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

जिंतूर ( जिल्हा परभणी)  :  येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी चंद्रकांत बनाटे यांचा मुलगा  नितीन बनाटे (वय २६) मित्रांसोबत येलदरी धरणात (ता.जिंतूर, जि.परभणी) पोहण्याकरिता गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१४) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

जिंतूर पोलिस ठाण्यात सात महिन्यापूर्वी रुजू झालेले चंद्रकांत बनाटे यांचा मुलगा नितीन बनाटे (वय २६) हा  गुरुवारी दुपारच्या सुमारास मित्रांसोबत येलदरी धरणाचत वाढलेले जलाशय पाहण्यासाठी जात असल्याचे घरी सांगून गेला होता. त्यावेळी त्याला व मित्रांना जलाशयात पोहण्याचा मोह आवरला नाही.  दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो धरणातील जलाशयात पोहण्यासाठी उतरला पण त्यास पोहणं येत नसल्याने तो बुडू लागल्याचे पाहून सोबतच्यांनी बचावाकरिता आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. मात्र त्याला पोहणं येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्यानंतर तुकाराम गव्हाणे या तैराकाने तब्बल दीड तास पाण्यात शोध घेऊन नितीन याचे मृत शरीर  बाहेर काढले. त्याच्या मृतदेहावर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन  करण्यात आले. सायंकाळपर्यंत घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती. या घटनेमुळे जिंतूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा

खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड
परभणी : टाकळी बोबडे (ता.परभणी) येथील खुन प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता.१४) पुणे व मुंबई या दोन ठिकाणावरून ताब्यात घेतले.

टाकळी बोबडे (ता.परभणी) येथील ज्ञानोबा अस्वार यांचा ता. आठ नोव्हेंबर रोजी गळा चिरून खुन करण्यात आला. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ता. आठ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री तीन अज्ञात व्यक्तींनी मृत ज्ञानोबाची पत्नी रंजना यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. व त्यांचा नवरा ज्ञानोबा अस्वार यांना बाहेर ओढत नेऊन धारदार शस्त्राने मानेवर वार करून, गळा चिरून खुन केला अशी तक्रार रंजना अस्वार यांनी दिली होती.

या प्रकरणात आरोपी अमोल बापुराव अस्वार, नितीन किशन घायाळ व बालासाहेब सखाराम माऴवदे  या तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली. या घटनेचा तपास लावण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death in drowning in Yeldari Dam