जखमी अवस्थेत आढळलेल्या  तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

औरंगाबाद - सिडको बसस्थानक परिसरात बुधवारी (ता. 16) सकाळी गंभीर जखमी अवस्थेत एक तरुण विवस्त्र अवस्थेत आढळला होता. घाटीत उपचारादरम्यान शुक्रवारी सव्वाबारा वाजता त्याचा त्याचा मृत्यू झाला. रमेश आनंदराव नरवडे (35, रा. रामनगर, तान्हाजीनगर, एन- 2, सिडको) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त शिक्षक आनंदराव नरवडे यांचा मुलगा रमेश मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला होता. त्या दिवशी रात्री तो घरी परतला नाही. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या ओळखीच्या एका रिक्षाचालकाने त्यांना रमेश सिडको बसस्थानकाजवळील नवनाथ हॉटेलसमोर जखमी अवस्थेत विवस्त्र आढळल्याचे सांगितले. दरम्यान, त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सव्वाबाराच्या सुमारास त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रमेशच्या मृत्यूनंतर शनिवारी (ता. 19) त्यांचे आनंदराव नरवडे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Death during treatment of the youth