उमरग्यात आगीत होरपळून मायलेकराचा मृृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

निलंगा - उमरगा (हाडगा, ता. निलंगा) येथील घरात झोपलेल्या आई व मुलाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे घडली.

निलंगा - उमरगा (हाडगा, ता. निलंगा) येथील घरात झोपलेल्या आई व मुलाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे घडली.

उमरगा येथील किराणा दुकानदार रामदास बिराजदार यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. सोमवारी (ता. 21) पहाटे बांधकामाला पाणी घालण्यास ते पहाटे उठले असता घरातून धूर व फटाक्‍यांचा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घरातील वीजपुरवठा बंद करून पाणी मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत आगीमध्ये रामदास यांची पत्नी शुभांगी बिराजदार (वय 28), मुलगा प्रेम बिराजदार (वय 3 वर्षे) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. घराचे बांधकाम सुरू असल्याने दुकानाचे इतर साहित्य एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: death by fire