esakal | जालन्यात चारजणांवर कोरोनाची झडप 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

कोरोनामुळे वाढणारा मृत्युदर मागील काही दिवसांपासून थांबण्यास तयार नाही. बुधवारी  चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ४९ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे.

जालन्यात चारजणांवर कोरोनाची झडप 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना -  कोरोनामुळे होणारा मृत्युदर मागील काही दिवसांपासून थांबण्यास तयार नाही. बुधवारी (ता.१५) चारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ४९ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ता.२० जुलैच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत लॉकडाउन वाढविले आहे. 

जिल्ह्यात बुधवारी बाधितांमध्ये तीन रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  दरम्यान, शहरातील रामनगर येथील ६५ वर्षीय पुरुषाला श्वसनासह मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. ता.१३ जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच भावसार गल्ली येथील ३५ वर्षीय पुरुषाला ता. नऊ जुलै रोजी सामान्य रुग्णालय येथे श्वसनाचा व न्युमोनियाचा त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते. त्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. तर इंदिरानगर येथील ५६ वर्षीय महिलेचा ता. १३ जुलै रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. बुधवारी (ता.१५) त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच धावडा (ता. भोकरदन) येथील ४८ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. सामान्य रुग्णालय येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जिल्ह्यात आतापर्यंत ७१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात बुधवारी (ता.१५) अकरा जणांना कोरोनावर मात केल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील चार, जालना शहरातील दोन, दुःखीनगर, सुखशांतीनगर, अण्णा भाऊ साठेनगर, दहिपुरी (ता.अंबड), मानदेऊळगाव (ता. बदनापूर) येथील प्रत्येक एकजण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यातील ४५४ जणांना बुधवारी (ता.१५) संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३०, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे ३०, गुरू गणेश भवन येथे १२, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ३५, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५३, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक येथे एक, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक येथे २६, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक येथे १०७, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक येथे ५४, परतूर येथील केजीबीव्ही येथे सात, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे आठ, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे पाच, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३२, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १०, घनसवांगी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सहा, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे ११, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे दोन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सात, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीन, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे पाचजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

 (संपादन : संजय कुलकर्णी)