भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Death of four people in one family in a horrific accident near aashti beed
Death of four people in one family in a horrific accident near aashti beed

आष्टी : ट्रक आणि इरटीगा कारची समोरासमोर धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (ता. 17) पहाटे परिसरातील पोल फॅक्टरी जवळ घडली.

जामखेड वरुन आष्टीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकची आष्टी वरुन जामखेडकडे जाणाऱ्या इरटीगा गाडीला जोराची धडक झाल्याने हा अपघात झाला. 
ट्रक (क्रं एम.यु. 39 यु 2447) आणि इरटीगा (क्रं.जी.जे. 15 सी.डी. 6081) या वाहनांची जोरदार धडक आष्टी-जामखेड महामार्गावर असणाऱ्या पोल फॅक्टरी समोर झाली. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोघांचा जागीच तर दोन जणांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. 

हा अपघात रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झाला असून मृतांमध्ये नागेश चमकुरे, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे आणि सात वर्षीय अनिकेत चमकुरे (सर्व राहणार मुखेड जि. नांदेड) यांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com