घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलीचा डेंगीने मृत्यू

योगेश पायघन
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला घाटीच्या आतदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 14) पहाटे अडीचच्या सुमारास ती दगावली. शीतल साईनाथ कीर्तिकर असे मृत मुलीचे नाव आहे. 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला घाटीच्या आतदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 14) पहाटे अडीचच्या सुमारास ती दगावली. शीतल साईनाथ कीर्तिकर असे मृत मुलीचे नाव आहे. 

साईनाथ कीर्तिकर घाटीच्या बाह्यरुग्ण विभागात अस्थीव्यगोपचार विभागात कार्यरत आहे. त्यांना बी-2 विंग मधील 8 नंबरचे निवास्थान मिळाले आहे. या निवस्थानांच्या चारही बाजूने घाणीचा विळखा आहे त्यामुळे या इमारतीत आणखी दोघाना डेंगीची लागण झाली असल्याची माहिती येथील रहिवाशी रवी मगरे यांनी दिली. तर याच इमारतीत राहणाऱ्या शबाना शेख यांनी त्यांच्या नातीला व्हायरल फिवर आणि मुलीला साथरोगाची लागण झाल्याचे 'सकाळ' ला सांगितले. शीतलच्या मृत्यू नंतर कर्मचारी निवस्थानातील रहिवाशी कर्मचारी व नातेवाईकांनी प्रशासन स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला. तर कास्ट्राईब कर्मचारी संघटनेनेचे विलास जगताप यांनी शीतलच्या मृत्यूला घाटी तसेच वाररांवर विनंती करून ड्रेनेजची दुरुस्ती न करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत असल्याचे सांगितले. 

डेंगी स्वच्छ पाण्यातील डासांनी होतो
या घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधीक्षक डॉ कैलास झिने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास राठोड यांनी नातेवाईकांची भेट घेतली. डेंगी स्वच्छ पाण्यातील डासांनी होतो मात्र अस्वच्छता दूर करू असे सांगून नातेवाईकांची आस्थेवाईक विचारपूस केली. शिवाय शीतलला डेंगी झाल्याची पुष्ठी दिली. मात्र, त्यांना नातेवाईक व कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला. 

स्वर्गरथ नेण्यासाठी तोडले खांब
घाटीचे मागचे गेट बंद गेल्या महिन्यात बंद करण्यात आले आहे. मात्र शीतलच्या अंत्यसंस्काराला स्वर्गरथ नेण्यासाठी त्याच गेट मधून व्यवस्था व्हावी अशी मागणी करत नातेवाईकांनी मागचे खांब जेसीबीने तोडायला लावले. त्यानंतर स्वर्गरथ रवाना झाला.

 

Web Title: death of a girl due to dengue in Ghati Hospital Aurangabad