उकळते दूध अंगावर पडल्याने दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

उकळते दूध अंगावर पडल्याने दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

नांदेड : उकळते दूध अंगावर पडल्याने गंभीर भाजलेल्या त्या बालिकेचा अखेर उपचारादरम्यान शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना सात जानेवारी रोजी माळाकोळी येथे घडली होती.

माळाकोळी (ता. लोहा) येथील दामु राठोड यांची मुलगी तुळसा (वय- दीड वर्ष) ही अंगणात सोमवारी (ता. सात) खेळत होती. यावेळी घरातील चुलीवर दूध तापत होते. खेळत- खेळत ही बालिका दुधाच्या पातेल्याकडे गेली. तिचा धक्का लागल्याने उकळते दूध तिच्या अंगावर पडले. यात ती गंभीर भाजली होती.

नातेवाईकांनी तिला विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तिने उपचारास प्रतिसाद दिला नाही. अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रुग्णालयीन पोलिस चौकीचे नाईक एस. एस. वरपडे यांनी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे माळाकोळी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार गीते हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com