सात मुलींच्या पाठीवर जन्माला येणाऱ्या मुलासह आईचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

मीरा रामेश्वर एखंडे (वय 38) असे या महिलेचे नाव असून, तिला आठव्यांदा प्रसूतीसाठी बीडच्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बाळंतपणा वेळीच रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यावेळी तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा ही दुर्दैवी अंत झाला आहे.

बीड : सात वेळा मुलीचा जन्म झाला आणि मुलाच्या हट्टापायी आठव्यांदा बाळंतपणाला सामोऱ्या जाणाऱ्या मातेचा करून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.

मीरा रामेश्वर एखंडे (वय 38) असे या महिलेचे नाव असून, तिला आठव्यांदा प्रसूतीसाठी बीडच्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बाळंतपणा वेळीच रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यावेळी तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा ही दुर्दैवी अंत झाला आहे.

हे कुटुंब सध्या परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे वास्तव्यास आहे. या प्रकरणी अद्याप काही कारवाई करण्यात आलेली नाही. 

Web Title: death of the mother, along with the one who is born on the back of seven girls