पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

औरंगाबाद : पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने राहुल अर्जुन गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

पोलिसांनी राहुलला अटक करून पोलिस जीपमधून घेऊन जात होते. यावेळी त्याचा जीपमधून पडून मृत्यू झाला आहे. परंतु, पोलिसांच्या मारहाणीमुळे राहुलचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवाय, घाटी रुग्णालयात गोंधळ घालत पोलिसांना शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा मृत राहुल गायकवाडच्या नातेवाईकांनी दिला आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेचे पाच पोलिस तडकाफडकी निलंबित केले आहेत.

Web Title: The death of one of the heads of the police car jump