जालन्यात कोरोनामुळे सहाजणांचे बळी 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.

जालना -  जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे तांडव सुरू आहे. शनिवारी (ता.२९) तब्बल सहा कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत १३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर ९८ बाधितांची नव्याने भर पडली आहे,

जिल्ह्यात साडेचार हजार कोरोनाबाधितांचा टप्पा पार झाला आहे. तर ८७ जणांना कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यात तीन हजार २४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्हा कोविड रुग्णालय येथे उपचार सुरू असलेल्या सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये जालना शहरातील फुलबाजार येथील ७४ वर्षीय महिला, शहरातील ५८ वर्षीय पुरुष, अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील ६५ वर्षीय पुरुष, बदनापूर शहरातील ७५ वर्षीय महिला, भोकरदन तालुक्यातील टाकळी बाजार येथील ४५ वर्षीय पुरुष व देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ९८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये परतूर तालुक्यातील कराळा येथील सातजण, हातडी येथील चारजण, जालना शहरातील मोदीखाना, बठाण, आष्टी, देऊळगाव राजा व नीळखेडा येथील प्रत्येकी तीनजण, घनसावंगी, हिस्वन, टेंभुर्णी दैठणा व वाघाळा (ता.सिंदखेडराजा) येथील प्रत्येकी दोन जण, जालना शहरातील शनिमंदिर, अग्रसेननगर, कृष्णकुंज, ढवळेश्वर, कन्हैयानगर, सकलेचानगर, तुळजाभवानीनगर, शाकुंतलनगर, हलदोला (ता. बदनापूर), भोरखेडा गायके (ता.जाफराबाद), अंतरवाली, सिरसगाव, नेर, गोंदी, गोलापांगरी, कुऱ्हाडी, सिद्धेश्र्वर पिंपळगाव, लोणगाव, भारज, देऊळगाव उगले, तपोवन, बोरखेडी, सेलगाव, केळीगव्हाण, हिवर्डी, बोरगाव येथील प्रत्येकी एकजण असे ६२ कोरोनाबाधित आढळून आले, तर अँटीजेन तपासणीद्वारे ३६ जण असे एकूण ९८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

उपचारानंतर ८७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये शहरातील नेहरू रोड येथील आठजण, दानाबाजार येथील पाचजण, बावणे पांगरी येथील सहाजण, जालना शहरातील कालीकुर्ती व मंठा शहरातील प्रत्येकी चारजण, चिंचोली येथील तीन जण, जालना शहरातील योगेशनगर, प्रीतिसुधानगर, रामनगर साखर कारखाना, झाशीची राणी पुतळा परिसर, अंबड शहर, डोंगरगाव, परतूर शहरातील जयभवानी गल्ली व वखारी येथील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील इंदिरानगर, गुरु गोविंदसिंगनगर, भीमनगर, शाकुंतलनगर, लक्ष्मीनगर, नूतन वसाहत, फुलंब्रीकर नाट्यगृह, भवानीनगर, संभाजीनगर, सोनलनगर, सकलेचानगर, मिशन हॉस्पिटल परिसर, उतार गल्ली, श्रीकृष्ण-रुक्मिणीनगर, पांगारकरनगर, श्री कॉलनीनगर, नयाबाजार, नाथबाबा गल्ली, बडी सडक, राज बिल्डिंग, एसआरपीएफ गेट, रहेमानगंज, रुक्मिणीनगर, शनी मंदिर, जुना जालना, कादराबाद, आझाद मैदान, घनसावंगी, अकोला (ता. बदनापूर), पांगरी गोसावी, वरखेड, चिखली, देवठाणा, सिंदखेडराजा, दाभाडी, पाचोड, चंदनझिरा, देऊळगाव मही, खासगाव, सेलू (जि. परभणी), बदनापूर येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत तीन हजार २४६ जणांना कोरोनावर मात केली असून सध्या एक हजार १४७ जणांवर उपचार सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com