स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

करमाड - वाहेगाव-देमणी (ता. औरंगाबाद) येथील एका विवाहितेचा (वय 24) स्वाईन फ्लूने गुरुवारी (ता. सहा) दुपारी अडीचच्या सुमारास घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यावर सायंकाळी सहाला अंत्यसंस्कार करण्यात आले.

आठ दिवसांपासून त्यांना स्वाईन फ्लूची लागण झालेली होती. खासगी रुग्णालयात सुरवातीला आजाराचे निदान झाले नाही. खासगी रुग्णालयाने बुधवारी (ता. पाच) मुंबईला पाठविलेल्या अहवालात स्वाईन फ्लूचे निदान झाले. त्यामुळे त्यांना बुधवारीच घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, घाटी रुग्णालयाने पुणे येथे पाठविलेल्या अहवालातही स्वाईन फ्लूचेच निदान झाले. त्यानुसार उपचार सुरू असताना गुरुवारी (ता. सहा) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: death by swine flu

टॅग्स