स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

औरंगाबाद - मागील महिनाभरापासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 8) घडली.

औरंगाबाद - मागील महिनाभरापासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 8) घडली.

उष्णतेचा पारा चढत असतानाही थंडीच्या काळातच धोका ठरणाऱ्या स्वाईन फ्लूने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. थंडी, ताप, खोकला असलेले रुग्ण घाबरून तातडीने रुग्णालयात तपासण्या करीत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे केवळ थंडीच्या काळातच धोकादायक ठरणारा हा स्वाईन फ्लू ऐन कडक उन्हाळ्यात रुग्णांचे बळी घेत असल्याने धोका वाढला आहे.

Web Title: death by swine flu