तळ्यात बुडून एकाच वर्गातील दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

किल्लारीजवळील तळ्यात बुडून एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू...

किल्लारी- तळणी (ता. औसा) येथील त्रिवेणी देशमुख माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली.

किल्लारीजवळील तळणी गावापासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या शेततळ्यात पाय घसरुन पडुन किरण हारी गाडे (वय 14) , संतोष विठ्ठल प्रताळे (वय 15 ) यांचा शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाला.

घटनेची माहीती मिळताच किल्लारी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरक्षक गणेश कदम उमाकांत चपटे यांनी घटनास्थळी जाऊन मृतांना बाहेर काढले. त्यानंतर पंचानामा करण्यात आला. या प्रकरणी बालाजी शेषेराव प्रताळे (वय 44) यांच्या फिर्यादीवरुन किल्लारी पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Death Of Two Students Due to drowning in the water near Killari