esakal | हिंगोली जिल्ह्यात कर्जमुक्तीचे ९० हजार ४८८ शेतकऱ्यांच्या खात्यात

बोलून बातमी शोधा

Debt relief amount is being deposited in the loan account of farmers in Hingoli district}

कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या वेळोवळी याद्या जाहीर करण्यात आल्या. त्यांनतर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे बंधनकारक करण्यात आले होते.

हिंगोली जिल्ह्यात कर्जमुक्तीचे ९० हजार ४८८ शेतकऱ्यांच्या खात्यात
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात  महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ ची अंमलबजावणी दोन वर्षापासून सुरू आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे काही महिने ही योजना रखडली होती. आत्ता मात्र या योजनेची अमंलबजावणी सुरू झाल्याने आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जात आहे.आत्तापर्यंत ९० हजार ४८८ शेतकऱ्यांच्या खात्यात ५८९ कोटी २५ लाख ९८ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात दोन लाखापर्यंत थकबाकी जसलेल्या जवळपास एक लाख पाच हजार २८० शेतकरी पात्र निकषानुसार मात्र ठरले आहेत. त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जवळपास ६२८ कोटी ८७ लाख ९५ हजार रुपयाची आवश्यकता होती.

कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या वेळोवळी याद्या जाहीर करण्यात आल्या. त्यांनतर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आत्तापर्यंत पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची संख्या एक लाख एक हजार ८१६ अशी आहे. त्यातील ९६ हजार १३२ शेतकऱ्यांची नावे  ग्रीन लीस्ट मध्ये समाविष्ट झाली. ग्रीन लीस्टमध्ये पोर्टलवर नाव समाविष्ट झाल्यानंतर आधार यादीनुसार प्रामाणिकरण केल्यानंतर त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली.

१२ हजार ७८० शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण पूर्ण केले. या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम वर्ग केली जात आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत ९० हजार ४८८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ५८९ कोटी २५ लाख ९८ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. आधार प्रामाणिकरण केलेल्या अजूनही दोन हजार २९२  शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभाची समाविष्ट प्रतिक्षा आहे.

अधार लिंक केलेली कर्ज खाती संख्या उर्वरित एक लाख पाच हजार २८० असून त्यातील पोर्टलवर प्रक्रिया नावे एक लाख एक हजार ८१६  शेतकऱ्यांची यादी  पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या यादीनुसार शेतकऱ्यांची नावे ग्रीन यादीमध्ये बँकाना वंचित शेतकऱ्यांच्या घोषणेबाबत शासन कर्जदार शेतकऱ्यांना समाविष्ट होत असून असे शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरत आहेत. तीन हजार ४६४ शेतकरी अजूनही प्रत्यक्षात कर्जमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.