ट्रक खरेदीच्या व्यवहारात फसवणूक

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 24 जुलै 2019

सोलापुर येथे ट्रक विक्रीचा करारनामा केला पन्नास हजार रुपये बयाना देऊन उर्वरीत पैसे न देणाऱ्या बाळासाहेब ताटे विरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : ट्रक विक्रीचा करारनामा करून पन्नास हजार रुपये बयाना देऊन उर्वरीत पैसे न देणाऱ्या सोलापूरच्या बाळासाहेब ताटे विरूध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

येथील लेबर कॉलनी भागात राहणारा व्यापारी अब्दुल शहीद अब्दुल हमीद (वय 49) यांच्याकडे असलेला ट्रक (एमएच 26 - बीई 0851) हा सोलापूर जिल्ह्यातील गावठाण सगन, निरनारसिंगपूर येथील बाळासाहेब ताटे याने खरेदी केला. विक्री करार करून अब्दुल शहीद यांच्याकडून पन्नास हजार रुपये बयाना दिला. त्यानंतर टाटा  फायनान्स भरून ट्रक नावावर करून घेण्यासाठी करारनामा करून घेतला.

बाळासाहेब ताटे हा ट्रक घेऊन गेला. परंतु उर्वरीत रक्कम दिली नाही. तसेच ट्रकही परत केला नाही. अनेकवेळा त्याला मागितले परंतु तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. हा व्यवहार (ता. 4) जानेवारी 2019 ला झाला होता. शेवटी करारनामा संपुष्टात आल्याचे कारण पुढे करून बाळासाहेब ताटे याने विश्‍वासघात केला.

अखेर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अब्दुल शहीद यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोलापूरच्या बाळासाहेब ताटे विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार किरणकुमार देशमुख हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deception in a truck buying process