दगडफेक करून सिकंदराबाद-शिर्डी रेल्वे लुटली

वृत्तसंस्था
शनिवार, 12 मे 2018

सिग्नल मिळाला नसल्याने देऊळगाव स्थानकालगत सिकंदराबाद- शिर्डीला रेल्वे थांबविण्यात आली. तेवढ्यात आठ चोरट्यांनी दगफेक करून रेल्वेवर दरोडा टाकला. त्यात एक तिकीट निरीक्षक जखमी झाला असून चोरटे प्रवाशांजवळील सोने, चांदी, पैसे घेवून पसार झाले.

परभणी : देऊळगाव अवचार (ता.सेलू, जि.परभणी) येथील रेल्वेस्थानकालगत चोरट्यांनी दगडफेक करून सिकंदराबाद-शिर्डी रेल्वे लुटली. शनिवारी (ता.१२) पहाटे दोन वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली.

सिग्नल मिळाला नसल्याने देऊळगाव स्थानकालगत सिकंदराबाद- शिर्डीला रेल्वे थांबविण्यात आली. तेवढ्यात आठ चोरट्यांनी दगफेक करून रेल्वेवर दरोडा टाकला. त्यात एक तिकीट निरीक्षक जखमी झाला असून चोरटे प्रवाशांजवळील सोने, चांदी, पैसे घेवून पसार झाले. या घटनेची नोंद शिर्डी पोलिसांत झाल्याने नुकसानीबाबत अनभीज्ञ असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त के.एम. कौंडय्या म्हणाले.

घटनेनंतर शासकीय रेल्वे पोलिस, महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तपासासाठी दोन टीम रवाना झाल्या आहेत.

Web Title: decoit on Sikandarabad-Shirdi railway