डाॅ. सुरेश करंजकर यांच्या घरी दरोडा पडल्याने खळबळ

तानाजी जाधवर
शनिवार, 1 जून 2019

या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर स्वत: पोलिस अधिक्षक आर.राजा यांनी घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सध्या सुरु असुन त्या भागात अन्य ठिकाणी असलेल्या फुटेजची देखील पाहणी करण्यात येत आहे.

उस्मानाबाद : येथील प्रसिद्ध डाॅ. सुरेश करंजकर यांच्या राहत्या घरी रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे.

दहा ते पंधरा शस्त्रासह लोकांनी केलेल्या हल्ल्यात डाॅ. करंजकर यांच्या पत्नी जखमी आहेत. घराच्या गेटवरुन उडी मारुन चोरट्यानी प्रवेश केला. समोरच्या दरवाजाच्या कडी कोंडा उचकटुन घरात प्रवेश केला. तलवारीसह अन्य शस्त्राचा धाक दाखवुन घरातील प्रत्येक खोलीतील कपाटातुन मुद्देमाल लंपास केला शिवाय तिजोरीतील रोकड व सोन्याचे दागिने पळवुन नेल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर स्वत: पोलिस अधिक्षक आर.राजा यांनी घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सध्या सुरु असुन त्या भागात अन्य ठिकाणी असलेल्या फुटेजची देखील पाहणी करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात सोन्याची दागिणे व रोख रक्कम चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decoit on suresh karanjkar in osmanabad