रामेश्‍वरचा दीपक कराड महाराष्ट्र कुस्ती महा-वीर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

लातूर - रामेश्‍वर (रुई, ता. लातूर) येथील मल्ल दीपक कराड यांनी बीडचा मल्ल गोकुळ आवारे यांचा पाच-चार अशा गुणांनी पराभव करून महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांचा 51 हजार रुपये रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व तलवार देऊन सत्कार करण्यात आला. गोकुळ आवारे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांचा रौप्यपदक, तलवार व 31 हजार रुपये, तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या पुण्याच्या अनिल जाधव यांचा 21 हजार रुपये रोख, कांस्यपदक व तलवार देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सव्वापाचशे मल्लांनी भाग घेतला. 

आळंदीच्या विश्‍वशांती केंद्र, पुण्याच्या माईर्स एमआयटी व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने रविवार (ता. 19) व सोमवार (ता. 20) दोन दिवस रामेश्‍वर येथे राष्ट्रधर्मपूजक-दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा घेण्यात आली. हिंद केसरी गणपतराव अळंदकर, हिंद केसरी दीनानाथ सिंह, एमआयटीचे प्रमुख प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, रामेश्‍वरचे माजी सरपंच तुळशीराम कराड, काशीराम कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, एमआयटीचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशआप्पा कराड, कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, रावसाहेब मगर, छोटे रावसाहेब मगर, शिवाजीराव कितार, ज्ञानदेव पालवे व छत्रपती पुरस्कार विजेते शरद पवार यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत सहभागी 75 पेक्षा अधिक वर्षे वय असलेल्या मल्लांपैकी अर्जुन काळे, विठ्ठल गोरे व शेषराव पाटील यांचा अनुक्रमे महर्षी स्वातंत्र्यसेनानी रामचंद्र गोपाळ शेलार ऊर्फ शेलारमामा स्मृती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक देऊन सत्कार करण्यात आला. बाबा निम्हण यांनी सूत्रसंचालन केले. 

इतर वजन गटातील विजेते 
स्पर्धेतील 86 किलो वजन गटात भरत कराड, सागर बोटे व अनिकेत खोपडे, 74 किलो गटात वैभव शेटे, सोमनाथ कोरके व अक्षय डेळेकर, 70 किलो गटात अक्षय हिरगुडे, आकाश देशमुख व सुनील बडे, 65 किलो गटात प्रकाश कोळेकर, देवानंद पवार व बापू जरे, 61 किलो पंकज पवार, गणेश लोमटे व आबा अटकळे, 57 किलो गटात ज्योतिबा अटकळे, शिवराज होके व दयानंद सलगर हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. त्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. 

Web Title: Deepak karad maharashtra kusti maha veer