काटे जवळगा येथे नाला खोलीकरणास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

‘सकाळ रिलीफ फंडा’च्या मदतीने ‘तनिष्कां’नी घेतला पुढाकार

लातूर - ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या मदतीने काटेजवळगा (ता. निलंगा) येथील ‘तनिष्कां’नी नाला खोलीकरणाच्या कामासाठी पुढाकार घेतला आहे. त्याची सुरवात गावातील ज्येष्ठ तनिष्का सदस्यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १६) सकाळी श्रीफळ वाढवून करण्यात आली. या वेळी शांताबाई सोमवंशी, राजश्री सोमवंशी, शरद सोमवंशी, सुरेश गंगणे, दत्ता सूर्यवंशी, स्वरूप बिरादार, उपसंपादक अरविंद रेड्डी, तनिष्का समन्वयक संभाजी रा. देशमुख आदी उपस्थित होते. 

लोकवाट्यातून नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामात तालुक्‍यात काटेजवळगा गावाने आघाडी घेतली आहे. या नाला खोलीकरण व सरळीकरणामुळे सुमारे दीड कोटी लिटर पावसाचे पाणी अधिकचे साठणार आहे; तसेच परिसरातील विहिरी व विंधनविहिरींची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. गेल्यावर्षीपासून गावात लोकवाट्याच्या माध्यमातून गावाच्या विकासाची सुरवात झाली आहे. यंदा गावातील महिला व तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाच्या माध्यमातून  महिला संघटन व विकासासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या मदतीनमुळे अधिक बळकटी मिळणार आहे. राज्यभर दीड लाखापेक्षा अधिक सदस्य असलेल्या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील मोजक्‍याच गावांमध्ये महिलांसाठी विविध प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे महिलांमध्ये कौशल्यात्मक विकास वाढीस लागणार आहे. नाला खोलीकरणाच्या कामाच्या प्रारंभी प्रसंगी तनिष्का सदस्या रूपा गंगणे, जया कोडगिरे, रुक्‍मिण बिरादार, प्रिया सोमवंशी, चंद्रकला गंगणे, शिवलीला बावगे, अनिता कांबळे, सविता निला आदी उपस्थित होत्या. विविध उपक्रमांमध्ये अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेण्याचा निर्धार या वेळी उपस्थित तनिष्कांनी व्यक्त केला.

Web Title: Deepening of guttering near Kate javalaga