तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात मंगळवारी कलाविष्कार ग्रुप आणि स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. रांगोळी रेखाटून पणत्या लावण्यात आल्या होत्या.

सोलापूर संस्कार भारतीच्या रांगोळीप्रमुख मनीषा मोरवंचीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर परिसरात आकर्षक सुंदर रांगोळी रेखाटली होती.

स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या भक्तांतर्फे सायंकाळी पाचपासून होमकुंड आणि मंदिर परिसरात सर्वत्र पणत्या लावण्यात आल्या होत्या.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepotsav in Tuljavani Temple