भाजपला पराभूत करून लोकशाही मजबूत करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

अशोक चव्हाण : स्थानिक निवडणुकांच्या प्रचाराला सुरवात

उमरगा - केंद्र व राज्यातील भाजप सरकारने फसव्या घोषणा करून सत्ता प्राप्त केली आहे. या सरकारने तुघलकी कारभार करून जनतेला दारिद्य्राच्या खाईत लोटले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदानातून अशा सरकारच्या पराभवाची सुरवात करून देशाची लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी कॉंग्रेसच्या प्रचाराची सुरवात येणेगूर (ता. उमरगा) येथे चव्हाण यांच्या हस्ते झाली. या वेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, ""लोकाभिमुख सरकार म्हणून कॉंग्रेसने सर्वसमावेशक धोरणे, कार्यक्रम आखून अनेक कामे केली. केंद्र, राज्यातील सध्याचे सरकार केवळ "मार्केटिंग' करीत आहे. राज्यात आठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तरी भावनाहीन सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही. रावसाहेब दानवे यांनी तर कहर केला. दुष्काळ नव्हता, अशी वल्गना करून त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली. केंद्राने "नोटाबंदी'चा निर्णय घेऊन कष्टकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेतला. "ना खाऊंगा ना खाने दूंगा' अशी भाषा करणाऱ्या पंतप्रधानांच्या केंद्र व राज्यात "सब दबाके खा रहे है', नितीन गडकरीही त्याला अपवाद नाहीत. अशा सरकारला आता खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे.''

Web Title: defeat BJP and make democracy strong by