शाईच्या घाईला शहरात दोन दिवस उशीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

बीड - पोस्ट आणि बॅंकांतून नवीन नोटा आणि पाचशे, हजार रुपायांच्या नोटा बदलून द्यायला सुरवात केली; पण एकाच व्यक्तीने पुन्हा- पुन्हा नोटा बदलून नेऊ नये, यासाठी आता बोटांना न पुसणारी शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला; परंतु शहरातील टपाल कार्यालय आणि बॅंकांत अद्याप शाईचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे याला दोन दिवस उशीर होण्याची शक्‍यता आहे.

बॅंक आणि पोस्टातून नोटा बदलून दिल्या जात आहेत. दरम्यान, एका व्यक्‍तीला एका वेळी चार हजार रुपयेच दिले जात आहेत; पण काही जण पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहून नोटा बदलून घेत आहे किंवा आज या बॅंकेतून तर उद्या दुसऱ्या बॅंकेतून असे प्रकार सुरू झाले आहेत. काही लोकांनी नोटा बदलून घेण्यासाठी रोजाने व्यक्ती लावल्याचीही चर्चा आहे. त्यावर आळा घालण्यासाठी बोटाला शाई लावली जाणार आहे. त्यामुळे दुबार नोटा बदलून घेण्याच्या प्रकाराला आळा बसेल, असा बॅंक व्यवस्थापनाचा अंदाज आहे. त्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढले असून, ते विविध बॅंकांच्या जिल्हा प्रबंधक कार्यालयांना पोचले आहे; मात्र बोटाला लावण्यासाठीची शाई अद्याप बॅंकांच्या मुख्य कार्यालयांकडून आलेली नाही. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांनी बोटाला शाई लावणे सुरू होईल.

Web Title: Delay of two days in the beed city