धावत्या बसमध्येच महिलेची प्रसुती; काही वेळातच दगावले बाळ

The delivery of a woman in a running bus
The delivery of a woman in a running bus

बीड - पोटात प्रसुती कळा येवू लागल्याने गर्भवती महिलेला बीड येथे घेवून येत असताना धावत्या बसमध्येच महिलेची प्रसूती झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१५) दुपारी घडली. दुर्दैवाने प्रसुतीनंतर अवघ्या काही वेळातच बाळ दगावल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे सुरक्षीत मातृत्वासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न होत असले तरी दुसरीकडे जिल्ह्यात महिलेची प्रसुती आरोग्य सेवा वेळेवर न मिळाल्याने बसमध्ये झाल्याची घटना जिल्ह्यात घडल्याने शासन व प्रशासन यातील विरोध चव्हाट्यावर आला आहे. 


याबाबत, सविस्तर वृत्त असे की, बीड तालुक्यातील हिवरापाडी येथील वर्षा देवकते या दोन दिवसांपूर्वी बीड जिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. मात्र तुम्हाला प्रसूतीसाठी अजून आठ-दहा दिवसाचा अवधी असल्याचे रूग्णालयात त्यांना सांगण्यात आले व यामुळे गुरूवारी (ता.१४) दुपारी वर्षा देवकते यांना जिल्हा रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. परंतु दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.१५) सकाळी त्यांना प्रसुती कळा जाणवू लागल्याने घरच्यांनी सकाळी ११ वाजता हिवरापाडी-बीड या बस मधून बीडकडे आणण्यात येत असताना वाटेतच जरूड फाट्यावर आल्यानंतर महिलेच्या पोटात जास्त दुखू लागले. हे पाहून बसचालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. चालकाने जिल्हा रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेला फोन केला. हा प्रकार कळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कासट यांनी तत्काळ दखल घेत जरूड फाट्यापासून जवळच असलेल्या नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन डॉक्टरांचे पथक गर्भवती महिलेच्या उपचारासाठी पाठविले. मात्र तोपर्यंत बसमध्येच महिलेची प्रसुती झाली.

दरम्यान, बसमध्ये असलेल्या महिलांनी गर्भवती महिलेची मदत केली. यानंतर बाळाला जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मात्र जिल्हा रूग्णालयात बालरोगतज्ञ डॉ. बागलाने यांनी बाळाची तपासणी करून बाळाला मृत घोषित केले. वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्यानेच बाळाचा मृत्यू झाला असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com