पीक नुकसानीपोटी ३१२ कोटींची मागणी

file photo
file photo

परभणी : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पंचनाम्यांचा अहवाल तयार झाला असून जिल्हा प्रशासनाने चार लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या चार लाख ५६ हजार ९३३.२२ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांची नुकसान भरपाई म्हणून ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सलग २० दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे कापणी आलेल्या सोयाबीनसह वेचणी सुरू असलेल्या कपाशीचे मोठे नुकसान झाले. जवळपास सोयाबीन पाण्यात खराब झाले. कपाशीदेखील मातीत मिसळली आहे. अन्य पिकांनाही मोठा फटका बसला आहे. हाताशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हातबल झाले आहेत. महत्त्वाचा हंगामात असा डोळ्यांदेखत पाण्यात गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून मानसिक खच्चीकरणाला सामोरे जात आहेत. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. सलग तीन वर्षे कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या हाहाकाराचा सामना करावा लागला. पाऊस थांबताच झालेल्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाने ता. दोनपासून पंचनामे करण्यास सुरवात केली होती.

महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. मंगळवारी (ता. १२) या बाबतचा अहवाल जाहीर झाला आहे. यात चार लाख ६३ हजार ३७१ शेतकरी बाधित असल्याचे दाखवले आहे. पाच लाख ५६ हजार ३०.५३ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली होती. त्यापैकी चार लाख ५६ हजार ९३३.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. चार लाख ५४ हजार ६९८.३७ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, तर १७ हजार १९.४८ हेक्टरवरील बागायती पिकांचे आणि ५१२.७७ फळपिकांचे नुकसान झाल्याचे अहवाल म्हटले आहे. जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये प्रमाणे ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार आणि बागायत क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रमाणे दोन कोटी ३२ लाख १३ हजार, तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे ९२ लाख ८३ हजार, अशी एकूण ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार अशी मदत लागणार आहे.

अडीच लाख हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान


जिल्ह्यात सोयाबीनचे दोन लाख ५४ हजार ४४ हेक्टर, कपाशी एक लाख ८५ हजार ५७८ हेक्टरवर, ज्वारी सहा हजार ४४३, तूर सात हजार २६०, अशा प्रमुख पिकांचे नुकसान झाले आहे. अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

आपेक्षित निधी (लाखात)


परभणी : ५५६४.३९, सेलू : ३५०१.२५, जिंतूर : ४९९७.४७, पाथरी : २९२८.४, मानवत : २५५०.९९, सोनपेठ : १८९६.२२,
गंगाखेड : ३३९९.५१, पालम : २८७१.२६, पूर्णा : ३५५४.९६, एकूण : ३१२४४.४५
.....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com