मराठवाडा, खानदेशात  विजेची मागणी वाढली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

उन्हाळ्याचा चटका वाढत असतानाच विजेच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मराठवाडा आणि खानदेशात सर्वाधिक विजेची मागणी जळगाव विभागात वाढली आहे. सरासरी वाढीव मागणी 67 मेगावॉटपर्यंत गेली आहे. 

औरंगाबाद -  उन्हाळ्याचा चटका वाढत असतानाच विजेच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मराठवाडा आणि खानदेशात सर्वाधिक विजेची मागणी जळगाव विभागात वाढली आहे. सरासरी वाढीव मागणी 67 मेगावॉटपर्यंत गेली आहे. 

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे. त्याचा परिणाम विजेच्या मागणीत झाला आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागात सर्वाधिक विजेची सरासरी मागणी 31 मेगावॅट जळगाव, तर त्या खालोखाल औरंगाबाद 20 मेगावॅट, अशी नोंदवली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत 67 मेगावॅट अधिक विजेची मागणी मराठवाडा आणि खानदेशमध्ये नोंदविण्यात आली आहे.

Web Title: Demand for electricity in Marathwada, Khandesh