तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

शासनाने बंद केलेले तूर खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

लातूर - शासनाने बंद केलेले तूर खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तुरीचे उत्पादन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करणार असल्याचेही शासनाने जाहीर केले होते. त्यात निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले आहे; पण शासनाने नाफेडमार्फत खरेदी केली जाणारी तूर खरेदी केंद्रे अचानक बंद केली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आजही अनेक शेतकऱ्यांच्या घरी तूर शिल्लक आहे.

व्यापाऱ्यांकडून कमी भावात तुरीची खरेदी करून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे शासनाने तूर खरेदी केंद्रे सुरू करावीत, हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी केलेल्या व करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, शासनाने जाहीर केलेले सोयाबीनेच दोनशे रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित द्यावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी संघटनेच्या वतीने बाबासाहेब जाधव, दीपक सावंत, दीपक बारमले, सुशील जाधव, दिगंबर पेठकर, गणेश माने, सुधीर सूर्यवंशी, हंसराज धुमाळ, प्रमोद भिसे, भास्कर माने यांनी केली आहे.

Web Title: Demand to start tur purchase centre