बंद केलेले हरभरा खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

माजलगांव(बीड) - बंद केलेले हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून खरेदी  केलेल्या मालास बारदाणा व गोदाम उपलब्ध करून देण्यात यावेत. तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.एक) येथील हमीभाव खरेदी केंद्रासमोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उघड्यावर असलेल्या शेतक-यांच्या मापाचे व मापाअभावी असलेल्या तुर, हरभरा या मालाचे पंचनामे करण्यात यावेत आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत शासकीय हमीभावानुसार चालु असलेली खरेदी बुधवारी (ता. ३० मे) बंद केल्यामुळे वीस ते पंचवीस हजार क्विंटल माल पडुन आहे. शासनाकडुन गोदाम व बारदाणा उपलब्ध करून दिला जात नाही. शासनाकडुन शेतक-यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सभापती अशोक डक, उपसभापती निळकंठ भोसले, जयदत्त नरवडे, बालासाहेब जाधव यांचेसह शेतकरी सहभागी झाले होते. 

दरम्यान यावेळी निवेदन घेण्यासाठी तहसिलदार एन. जी. झंपलवाड उपस्थित नसल्याने 
आंदोलनकर्ते संतप्त झाले. 

Web Title: The demand for starting the closed gram shopping center immediately