लातूर विद्यापीठाच्या स्वतंत्र निर्मीतीसाठी कुलगुरूंकडे साकडे

सुशांत सांगवे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

लातूर पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अहवाल पाठवा, असे शिक्षण संचालकांनी दोन महिन्यांपूर्वी सांगूनही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अद्याप अहवाल तयार केला नाही. त्यामुळे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांची भेट देऊन त्यांना सकारात्मक अहवाल तातडीने सरकारदरबारी पाठविण्याचे निवेदन देण्यात आले.

लातूर : लातूर पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अहवाल पाठवा, असे शिक्षण संचालकांनी दोन महिन्यांपूर्वी सांगूनही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अद्याप अहवाल तयार केला नाही. त्यामुळे आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांची भेट देऊन त्यांना सकारात्मक अहवाल तातडीने सरकारदरबारी पाठविण्याचे निवेदन देण्यात आले.

लातूर पॅटर्नमुळे या शहराची शैक्षणिक शहर म्हणून ओळख झाली आहे. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या शहरातील विद्यार्थी लातूरात येतात. त्यामुळे लातूर शैणणिकदृष्ट्या वेगाने विस्तारत आहे. अशा शहरात स्वतंत्र विद्यापीठाची आवश्‍यकता आहे. ही मागणी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने सातत्याने लावून धरली आहे. मुख्यमंत्री, राज्यपाल, शिक्षणमंत्री, उच्च व तंत्र विभागाचे शिक्षण विभागाचे सचिव, लातूरचे पालकमंत्री, खासदार आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांना समितीच्या वतीने प्रत्यक्ष भेटून निवेदनही देण्यात आले आहे. त्यांनतर समितीने आता कुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्याकडे विद्यापीठाबाबतचा अहवाल तयार करा, अशी विनंती केली आहे.

उच्च शिक्षण विभागाच्या शिक्षण संचालकांनी लातूरात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनास कळविलेले आहे. अहवालात महाविद्यालयाची संख्या, विद्यार्थी संख्या, परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक वैशिष्ट्ये, भौगोलीक माहिती, संशोधन केंद्र, शैक्षणिक अडचणी नमूद करायच्या आहेत. हा अहवाल सादर करण्यास जाणीवपूर्वक प्रशासकीय दिरंगाई केली जात आहे, अशी खंत समितीतर्फे व्यक्त केली जात आहे. म्हणून समितीने थेट कुलगुरूंकडेच या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करण्यात अाली. कुलसचिवांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली. प्रदीपसिंह गंगणे, बालाजी पिपले, प्रवीण नाबदे, ताहेरभाई सौदागर, साईनाथ घोने, प्रा. संगमेश्वर पांनगावे, प्रा. गोविंद घार, बालाजी सिंगापूरेरेडी, अजित चिखलिकर उपस्थित होते.

Web Title: demands seaprate latur university to Chancellor SRT