प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क दुष्काळामुळे परत

Drought
Drought

औरंगाबाद - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत मान्यता दिलेल्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे.

शिक्षण मंडळाने दहावीच्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे प्रतिविद्यार्थ्याकडून चारशे रुपये जास्तीचे शुल्क आकारले होते. याबाबत शाळा आणि मुख्याध्यापक संघातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून घेतलेले जास्तीचे शुल्क कमी करण्यासाठी राज्य मंडळाकडे विनंती करण्यात आली होती; तसेच यंदा महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यातच जास्तीचे शुल्क वसूल केल्याने अनेक गरीब विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. या परिस्थितीचा विचार करून मंडळाने मुख्याध्यापकांची शुल्क कमी करण्याची मागणी मान्य करीत फक्त शंभर रुपये शुल्क घेणार असल्याचे मान्य केले; तर तीनशे रुपये विद्यार्थ्यांना परत देणार असल्याचे कळविले आहे. अद्याप औरंगाबाद विभागातून एकूण 4 हजार 59 विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले होते. या सर्व विद्यार्थ्यांना तीनशे रुपये देण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com