वडाळा येथे डेंगीसदृश आजाराचे थैमान

डेंगीचा डास
डेंगीचा डास

अंभई (जि.औरंगाबाद) : वडाळा (ता.सिल्लोड) येथे गेल्या काही दिवसांपासून डेंगीसदृश आजाराने थैमान घातले आहे. सहा रुग्ण उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यात करण सुधाकर शेळके (वय-सहा), कडूबाई शेषराव मानकर (50), पुनीत समाधान चाथे (10), साक्षी साईनाथ शेळके (15), बादशहा श्रीराम शेळके (15) यांचा समावेश आहे.

दैवशाला शेळके (25) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. येथे आठ दिवसांपासून गावात डेंगीसदृश तापाने थैमान घातले आहे. या गावात सहा दिवसांपूर्वी आरोग्यसेवक येऊन त्यांनी तपासणी केली होती; परंतु त्यानंतर कुठल्याच उपाययोजना केल्या नसल्यामुळे या आजाराच्या रुग्णामध्ये वाढ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या आजारामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दैवशाला शेळके यांच्यावर शनिवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती वडाळा येथील गजानन चाथे, बाबूराव डापके यांनी दिली.



याबाबत मला फोनवरून माहिती मिळाली असून, त्वरित वडाळा गावात घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे.
- डॉ. योगेश राठोड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आमठाणा

वडाळा गावात नेमण्यात आलेले आरोग्यसेवक हिवताप अधिकारी फोन केल्यानंतर सुद्धा वेळेवर येत नाही. वेळेवर येऊन गावातील पाणी नमुने तपासणी करावी, जेणेकरून असे आजार जडणार नाहीत.
- नवनाथ डाखोरकर, सरपंच, वडाळा

आरोग्यसेवक वेळोवेळी गावात येत नाही. वेळेवर येऊन गावातील लोकांचे रक्ताचे नमुने, पावसाळ्यात पाणीनमुने तपासणी करावी. जेणेकरून असे प्रकार उद्भवणार नाही. हा गंभीर आजार असून आरोग्य विभागाने त्वरित पथक नेमून डॉक्‍टराच्या पथकाने गावातील प्रत्येक ग्रामस्थाची तपासणी करावी.
- गजानन चाथे, ग्रामस्थ, वडाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com