मोबाईलच्या वापरामुळे तरुणांमध्ये नैराश्य: इंदुरीकर महाराज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

महालगाव - व्हॉट्‌सॲप, फेसबुक, युट्युब या सोशल मीडियात तरुण भरकटत चालला असून मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणांत नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. तणावमुक्त जगण्यासाठी आध्यात्म हे उत्तम साधन आहे, असे इंदुरीकर महाराज यांनी सांगितले.

महालगाव - व्हॉट्‌सॲप, फेसबुक, युट्युब या सोशल मीडियात तरुण भरकटत चालला असून मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणांत नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. तणावमुक्त जगण्यासाठी आध्यात्म हे उत्तम साधन आहे, असे इंदुरीकर महाराज यांनी सांगितले.

महालगाव (ता. वैजापूर) येथे आयोजित कीर्तनात बुधवारी (ता. १६) ते बोलत होते. यासाठी जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे यांनी पुढाकार घेतला. महाराज म्हणाले, की पालकांनी परीक्षांच्या काळात पाल्यांना मोबाईलपासून दूरच ठेवावे. यामुळे एकमेकांतील संवादही कमी झाला आहे. तसेच ग्रामीण भागातील मुलांना दहावीनंतरच्या शिक्षणाचे, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी व शेतीपूरक जोडधंद्याविषयी, शेतकरी महिलांना आरोग्याविषयी तसेच मतदारांत जनजागृतती वाढविण्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करण्याची गरज आहे.

या वेळी रामगिरी महाराज, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी नगराध्यक्ष साबेरभाई, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरणारे, रमेश गायकवाड, पंकज ठोंबरे, माजी सभापती बाबासाहेब जगताप, तालुका उपप्रमुख डॉ. प्रकाश शेळके, भीमाशंकर तांबे, मोहनभाऊ गायकवाड, संभाजी डांगे, काकासाहेब बुट्टे, संदीप बोर्डे, बाजार समितीचे सदस्य सुरेश आल्हाट, रवींद्र पठाडे, राजेंद्र हुमे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम आहेर, कैलास शेळके, संजय मोरे, दत्तू खपके, राजू गलांडे, सुधाकर गलांडे, अमोल मलिक, रोहित धुमाळ, गणेश शेळके यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते. यावेळी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप दत्ता नांगरे, गोरख शिनगारे यांनी केले. गाढेपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत रोगनिदान शिरिाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकी अधिकारी डॉ. राजहंस माटे, आरोग्य पर्यवेक्षक रमेश शिंदे, औषधी विभागाचे जयकुमार राठोड, परिचारिका वर्षा गोबाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ बाळू शिनगारे, आशा कर्मचारी यांनी रक्ततपासणी व मोफत औषधींचे वाटप केले.

Web Title: Depression youth due to the use of mobile says Indurikar Maharaj