अप्पर जिल्हाधिकारी पाच लाखाची लाच घेताना जाळ्यात

kamble
kamble

बीड : अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे व अव्वल कारकुन महादेव महाकुंडे या दोघांना पाच लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्याची घटना नुकतीच घडली. पुरवठा विभागातील चौकशी अहवालावरील कारवाई टाळण्यासाठी ही लाच स्विकारताना ही कारवाई करण्यात आली. 

पुरवठा विभागातील अनियमिततेची चौकशी करुन हा अहवाल अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्याकडे कारवाईसाठी गेला होता. कारवाई टाळण्यासाठी बी. एम. कांबळे यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली. प्रकरण पाच लाख रुपयांत ठरले. शनिवारी बी. एम. कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानी रक्कम देण्याचे ठरल्यावरुन लाच - लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. दरम्यान, लाच घेताना बी. एम. कांबळेसह महादेव महाकुंडे या पुरवठा विभागातील अव्वल कारकुनालाही अटक करण्यात आली. 

चार ठिकाणच्या घरांवरही छापे
दरम्यान, बीड येथील शासकीय निवासस्थानी लाच घेताना अटक केल्यानंतर बी. एम. कांबळे यांच्या बीडसह औरंगाबाद, नांदेड, तळेगाव येथील घरांवर लाच - लुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com